*कोकण Express*
*रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या एकूण अकरा पोलीस अधिकाऱ्यांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या*
*रत्नागिरी ः प्रतिनिधी*
रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या एकूण अकरा पोलीस अधिकाऱ्यांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची सातारा येथे, निशा जाधव यांची मुंबई, अरविंद घोडके यांची सांगली, विनीतकुमार चौधरी यांची पदोन्नतीवर प्रतिक्षेत बदली झाली असून चार निरीक्षकांच्या बदल्यात रत्नागिरीमध्ये कोल्हापूरहून दत्तात्रय नाळे, सुदाम माने हे अधिकारी दाखल होणार आहेत.
रत्नागिरीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरील भैरु जाधव यांची मुंबई रेल्वे, संदीप पाटील यांची मुंबई शहर, आबासो पाटील यांची मुंबई शहर, मधुकर मौळे यांची मुंबई शहर, संजय कातीवले यांची लोहमार्ग मुंबई आणि चित्रा मडवी यांची मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. उपनिरीक्षक पदावरील निपाद काळे यांची कोल्हापूर परिक्षेत्रात बदली झाली आहे.
*जनशक्तीचा दबाव न्यूज च्या व्हॉट्सॲप ग्रुपला जाॅईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…!*