*कोकण Express*
*उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के सुरूच ; कणकवली मधील हरकुळ खुर्द शिवसेना पक्षातील हरकुळ खुर्द सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, शिवसेना माजी विभाग प्रमुख व कार्यकर्ते यांचा भाजपा पक्षात प्रवेश*
*आमदार नितेश राणे यांनी ओम गणेश निवासस्थानी प्रवेश कर्त्यांचे केले स्वागत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हरकुळ खुर्द येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे धोंडू उर्फ अण्णा महादेव रासम हरकुळ खुर्द सोसायटी चेअरमन, सूर्याजी उर्फ बंड्या रविकांत रासम, व्हाईट चेअरमन शिवसेना माजी विभागप्रमुख गीतांजली रासम हरकुळ खुर्द सोसायटी संचालक, व कार्यकर्ते यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला. विरोधकांची जेवढ्या जोरात टीका सुरू आहे. त्या पेक्षा जास्तपटीने भाजपामध्ये इनकमिंग देखील सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला एक सारखे धक्के मिळत आहेत. यावेळी लवु सावंत, अर्जुन रासम, किशोर कासले, प्रशांत रासम, प्रथमेश रासम, सचिन रासम, श्रीकृष्ण पाटकर. प्रवेश कर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले. व विकास कामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही. अशी ग्वाही देखील प्रवेश कर्त्यांना दिली.
यावेळी उपस्थित आम. नितेश राणे, सुभाष दळवी भाजप कणकवली तालुका उपाध्यक्ष, राजेंद्र डिजवलकर शक्तीकेंद्र प्रमुख हरकुळ, राजन रासम, सर्वेश दळवी, पांडुरंग रासम, श्यामसुंदर रासम, शशी मंडव, संदीप खानविलकर, आकाश चव्हाण, सर्वेश बागवे, व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते