माणगाव येथील अवधूत गायचोर, संजय देवळी यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

माणगाव येथील अवधूत गायचोर, संजय देवळी यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

*कोकण Express*

*माणगाव येथील अवधूत गायचोर, संजय देवळी यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश*

माणगाव गायचोरवाडी येथील अवधूत गायचोर आणि देऊळवाडी येथील संजय देवळी यांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्ष संघटना वाढवण्याबरोबरच ग्रामपंचायत निवडणूकित शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार प्रवेशकर्त्यांनी केला.
यावेळी कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, रमाकांत ताम्हाणेकर, कौशल जोशी,बंडया कुडतरकर, बापू बागवे,सचिन भिसे, रुपेश धारगळकर,बच्चू नाईक, संदीप सावंत,मनीषा भोसले,डॉ. योगिता राणे, तेजस्वीनी नाईक,अक्षता धुरी, दर्शना पेडणेकर, मनाली धुरी,अनुष्का तेली,प्रीती आडेलकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!