*कोकण Express*
*कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टच्यावतीने चित्रकला स्पर्धा*
*17 डिसेंबरला कणकवली विद्यामंदीर विद्यालयात होणार स्पर्धा : सहभागी होण्याचे आवाहन*
*कासार्डे ; संजय भोसले*
कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विविध गटात आयोजित केली असून कणकवली येथील विद्यामंदीर हायस्कूलमध्ये 17 डिसेंबर ला सकाळी 11 ते 1 वा. या वेळेत होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चित्रकला स्पर्धेचे गटनिहाय विषय पुढिलप्रमाणे :
(पाचवी ते सहावी) – फुगेवाला, विदूषक (Joker).
(सातवी ते आठवी) – आवडता खेळ, माझा आवडता सण.
(नववी ते दहावी) – वाचनालयातील दृश्य, नदी काठावरील दृश्य.
(अकरावी ते बारावी) – सांस्कृतिक कार्यक्रमातील दृश्य, कला प्रदर्शन
(खुला गट) – मतदान केंद्रावरील दृश्य, प्रचारातील दृश्य
या स्पर्धेतील स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी कागद पुरविला जाईल. इतर आवश्यक साहित्य स्पर्धकाने घेऊन यायचे आहे. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम तीन व उत्तेजनार्थ दोन विजेत्या स्पर्धकांना विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष महेश काणेकर यांनी केले आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी महेश काणेकर, कणकवली (9422967547) किंवा राकेश कामेकर (8275652815) यांच्याशी संपर्क साधावा.