*कोकण Express*
*देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या घंटा गाड्यांवर खोडलेले आ. नितेश राणे यांचे नाव पुन्हा लिहिण्यात आले….*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड जामसंडे नगरपंचायतीला आमदार नितेश राणे यांनी आपल्या आमदार निधीतून घंटागाड्या घेऊन दिल्या होत्या मात्र कोणतेही कारण नसताना या घंटागाडीवरील नाव खोडून टाकण्यात आले . यावर भाजपाचे गटनेते शरद ठुकरुल व नगरसेवकांनी आक्रमक होऊन एक निवेदन होते या निवेदनात नाव पुन्हा लिहा अन्यथा आम्ही लिहू असा इशारा दिला होता यानुसार देवगड जमसांडे नगरपंचायतीने खोडलेले नाव पुन्हा लिहिले आहे याबाबत विद्यमान गटनेते शरद ठुकरुल व माजी नगराध्यक्ष प्रणाली माने यांनी माहिती दिली आहे.