*कोकण Express*
*सुरंगपाणी विठ्ठल पंचायतनातील दशावतारी नाटय़महोत्सवात सहभागी दशावतार नाटक मालकांचा खास गौरव*
*मिरज-सांगली येथील समर्थ वेळणास्वामी मठाचे मठाधिपती प.पू. कौस्तुभबुवा रामदासी यांची खास उपस्थिती*
*वेंगुर्ले ः प्रतिनीधी*
ग्रामीण भागात लोकवस्तीपासून लांब निरव शांतता असलेल्या भागात प.पू. दादा पंडित यांनी परमेश्वरी संकेतानुसार व अध्यात्मिकतेच्या प्रचारासाठी तसेच भाविकांना मन:शांती लाभणाऱ्या अशा श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानची केलेली निर्मीती हि एक सेवा आहे. या ठिकाणी आलेल्या भाविकांना समाधान लाभते. भाविकांत अध्यात्मिकतेची प्रेरणा व देवभक्ती वाढविण्यासाठी या स्थळावर करीत असलेले उपक्रम याची खरी गरज आजच्या काळात आहे. असे प्रतिपादन मिरज-सांगली येथील समर्थ वेळणास्वामी मठाचे मठाधिपती प. पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी खानोली-सुरंगपाणी येथील दशावतार महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.
खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान या धार्मिक स्थळावर दत्तजयंती निमीत्त आयोजित केलेल्या नाटय़महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व दशावतारी नाटय़मंडळाच्या मालकांचा मिरज-सांगली येथील समर्थ वेळणास्वामी मठाचे मठाधिपती प. पू. कौस्तुभबुवा रामदासी यांच्या प्रमुख उपस्थितीत कलेश्वर दशावतार नाटय़मंडळातील कलाकार कै. शांती कलींगण यांच्या स्मरणार्थ शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुषगुच्छ देवून खास श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान कमिटीचे व्यवस्थापक प. पू. दादा पंडित यांनी गौरव केला.
दत्तजयंती महोत्सव दि. 30 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर कालावधीत नाटय़महोत्सवात सहभाग घेतलेल्या चेंदवणकर दशावतार नाटय मंडळ चेंदवणचे मालक देवेंद्र नाईक, श्री महापुरुष दशावतार नाटय मंडळ सावंतवाडीचे मालक भाई शिर्के, खानोलकर दशावतार नाटयमंडळ खानोलीचे मालक बाबा मेस्त्री, वालावलकर दशावतार नाटय मंडळ वालावलचे मालक नाथा नालंग, जय हनुमान दशावतार नाटय मंडळ आरोसचे मालक शरद मोचेमाडकर, आजगांवकर दशावतार नाटय मंडळ, आजगांवचे रमेश आजगांवकर, कलेश्वर दशावतार नाटय मंडळ नेरूरचे मालक भाई कलिंगण, बाळकृष्ण गोरे दशावतार नाटय मंडळ कवठीचे मालक दिनेश गोरे, आरोलकर दशावतार नाटयमंडळ आरवलीचे मालक भाऊ आरोलकर आदी दशावतार मंडळाच्या मालकांचा मिरज-सांगली येथील समर्थ वेळणास्वामी मठाचे मठाधिपती प. पू. कौस्तुभबुवा रामदासी यांच्या प्रमुख उपस्थितीत कलेश्वर दशावतार नाटय़मंडळातील कलाकार कै. शांती कलिंगण यांच्या स्मरणार्थ शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पहार देवून खास श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान कमिटीचे व्यवस्थापक प. पू. दादा पंडित यांनी गौरव केला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांत मिरज-सांगली येथील समर्थ वेळणास्वामी मठाचे मठाधिपती प. पू. कौस्तुभबुवा रामदासी, मालवणचे उद्योजक दत्ता सामंत, तळवडे येथील उद्योजक राजाभाऊ गावडे, वेंगुर्लेतील उद्योजक दिगंबर नाईक, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी रविंद्र तांबोळकर, जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव देवयानी वरसकर, संजय वेंगुर्लेकर, भाऊ पोतकर, देवगडचे मनिष कुबल आदींचा समावेश होता. तसेच गोवा व सिंधुदुर्गातील भाविक मान्यवर उपस्थित होते.
या संपुर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन नेरूरचे राजा सामंत यांनी उकृष्ठपणे केले. तर आभार पंचायतनाचे व्यवस्थापक दादा पंडित यांनी मानले.