तोपर्यंत खचलेल्‍या उड्डाणपुलाची दुरुस्ती करू देणार नाही

तोपर्यंत खचलेल्‍या उड्डाणपुलाची दुरुस्ती करू देणार नाही

*कोकण Express*

*तोपर्यंत खचलेल्‍या उड्डाणपुलाची दुरुस्ती करू देणार नाही…!*

*आधी कणकवली शहराची पाणीपुरवठा वाहिनी आणि इतर कामे पूर्ण करा…*

*नगराध्यक्ष समीर नलावडे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शहराची पाणीपुरवठा वाहिनी आणि इतर कामे पूर्ण होत नाहीत, तोवर खचलेल्‍या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कार्यवाही सुरू करू नका. नगरपंचायतीला विश्‍वासात न घेता उड्डाणपूल दुरुस्तीचे काम सुरू केले तर आम्‍ही त्‍याला तीव्र विरोध करू, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे.
शहरातील उड्डाणपूल दुरुस्तीची कार्यवाही आज (ता. ९)पासून सुरू करण्याची तयारी महामार्ग विभाग आणि महामार्ग ठेकेदार कंपनीने केली होती. त्‍या अनुषंगाने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी हा इशारा दिला आहे.
शहरातील नळपाणी योजना सर्व्हिस रस्त्याखाली गेली आहे. त्‍यामुळे महामार्गालगतच्या नागरिकांना पाणीपुरवठा करता येत नाही. येथील नळयोजनेची दुरुस्ती करता येत नसल्‍याची स्थिती आहे. महामार्ग ठेकेदाराने शहरातील काम सुरू करण्यापूर्वी सेवा रस्ता दुतर्फा नळपाणी योजना नव्याने करून देण्याची ग्‍वाही दिली होती. मात्र, प्रत्‍यक्षात काम झालेले नाही. शहरातील सेवा रस्ता दुतर्फा गटारांची कामे अपूर्ण आहेत. पटवर्धन चौकात तर गटारे कोसळलेली आहेत. शहरातील नरडवे तिठा ते बसस्थानक या दरम्‍यान पथदीप बंद आहेत. ही कामे पूर्ण झाल्‍याशिवाय खचलेल्‍या उड्डाणपूल दुरुस्तीची कार्यवाही आम्‍ही करू देणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष नलावडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!