*कोकण Express*
*शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कासार्डे विद्यालयाच्या कुस्तीपटूंचे वर्चस्व*
*कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचा निकाल जाहीर*
*कासार्डे: संजय भोसले*
क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा परिषद सिंधुदुर्ग तसेच कणकवली तालुका क्रीडा परिषद समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या ‘कुडतरकर’ नाट्यगृहांमध्ये संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत तब्बल 27 गटांचे विजेतेपद कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कुस्तीगीरांनी पटकावल्यामुळे या संपूर्ण स्पर्धेत कासार्डे माध्यमिक विद्यालयानेच वर्चस्व गाजवले आहे.
या तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन कासारे विकास मंडळाचे स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांच्या शुभहस्ते ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि बलाचे उपासक हनुमंताच्या फोटो पूष्पहार अर्पण करून संपन्न झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य मधुकर खाड्ये, पर्यवेक्षक नारायण कुचेकर,विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा पंच दत्तात्रय मारकड, कुस्ती पंच अभिजीत सिटी सोनू जाधव,श्री.शंकरदास (करुळ),रुपेश चव्हाण विद्यालयाचे शिक्षिका,सौ.ऋचा सरवणकर, सौ.आरती पेडणेकर,ऋषिकेश खटावकर, नवनाथ कानकेकर,सिनिअर कुस्ती खेळाडू गजानन माने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी स्पर्धेचे उद्घाटक प्रभाकर कुडतरकर यांनी सातत्याने व्यायाम करून शरीर मजबूत आणि निरोगी ठेवा आणि कुस्तीसारख्या लाल मातीतल्या खेळांतून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव विभाग,राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उज्वल करण्याचे आवाहन कुस्ती पट्टूंना केले.
याप्रसंगी पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांचा जीवनपट कथन करून आदर्श घेण्याचे आवाहन केले. स्वागत प्रस्तावना क्रीडा शिक्षक दत्तात्रय वारकरी यांनी केले.
या स्पर्धेला कणकवली, करूळ, फोंडाघाट व कासार्डे या ठिकाणी कुस्तीपटूंनी हजेरी लावली होती.
*तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-*
*14 वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात:*
वजन गट 35 किलो
1) प्रथम- अमोल जाधव (कासार्डे हाय-)
2) द्वितीय- अरुण राठोड (कासार्डे हाय-)
3) तृतीय- ओमकार सावंत (करूळ हाय-)
4) चतुर्थ- संचित चव्हाण (करूळ हाय-)
वजन गट 38 किलो
1) प्रथम- दुर्वास पवार (कासार्डे हाय-)
वजन गट 44 किलो
1) प्रथम- अमजद शेख करूळ हाय-)
2) द्वितीय- सोहम लिंगायत (कासार्डे)
वजन गट 48 किलो
1) प्रथम- आर्यन कदम (कासार्डे)
2) द्वितीय- लोकेश मेस्त्री (कासार्डे)
वजन गट 52 किलो
1) प्रथम- अनिकेत चव्हाण (कासार्डे)
वजन गट 57 किलो
1) प्रथम- परशुराम राठोड (कासार्डे)
वजन घट 62 किलो
1) प्रथम- आदर्श राठोड (कासार्डे)
वजन गट 68 किलो
1) प्रथम- विघ्नेश पेडणेकर (कासार्डे)
2) द्वितीय- ओमकार चव्हाण (कासार्डे)
*14 वर्षे वयोगटातील मुलीच्या गटात-*
वजन गट 33 किलो
1)प्रथम -सना रहिमान शेख (कासार्डे)
2) द्वितीय -सिद्धी प्रशांत राणे (कासार्डे)
वजन गट 42 किलो
1) प्रथम- विधी संजय चव्हाण (कासार्डे)
2) द्वितीय -कामया सदाशिव राणे (करूळ)
वजन गट 50 किलो
1) प्रथम- साक्षी संतोष तेली (कासार्डे)
2) द्वितीय – पालवी विजय शेणवी (कासार्डे)
वजन गट 54 किलो
1) प्रथम- मृणाल संदीप सावंत (कासार्डे)
*17 वर्षे वयोगटातील मुली*
वजन गट 36 किलो ते 40 किलो
1) प्रथम -तन्वी संतोष पारकर (करूळ हाय.)
2) द्वितीय- आर्या अमित राणे (कासार्डे हाय.)
वजन गट 46 किलो
1) प्रथम- नंदिता प्रवीण मत्तलवार (कासार्डे)
वजन घट 69 किलो
1)प्रथम- पूजा दत्ता बर्मा (कासार्डे)
*17 वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात*
वजन गट 41 ते 45 किलो
1) प्रथम- विश्वास चंदू चव्हाण (कासार्डे)
वजन गट 48 किलो
1) प्रथम- पार्थ जयसिंग देसाई (कासार्डे)
2) द्वितीय- शोक संतोष मर्ये (करूळ हायस्कूल)
वजन गट 51 किलो
1) प्रथम- हर्ष भास्कर कानडे (कणकवली कॉलेज )
2)द्वितीय- अभिषेक निलेश राठोड (कासार्डे )
वजन गट 55 किलो
1) प्रथम- प्रथमेश राजू चव्हाण (कासार्डे)
2)द्वितीय- सुरज राजन तिरोडकर (करूळ हाय.)
3)तृतीय- श्रीशांत विश्वास आयरे (कासार्डे)
वजन गट 60 किलो
1) प्रथम – रोहित परशुराम चव्हाण (कासार्डे)
वजन गट 65 किलो
1) प्रथम – कृष्णा हरिबा पवार (कासार्डे)
2) द्वितीय- हर्षराज सदानंद पाताडे (कासार्डे)
वजन गट 71 किलो
1) प्रथम- शुभम सत्यवान पाटील (कासार्डे)
*19 वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात*
वजन गट 57 किलो
1) प्रथम -भावेश मधुकर चव्हाण (कणकवली कॉलेज)
2) द्वितीय- वैभव राजेश माने (कासार्डे)
3) तृतीय- यशदीप जयंत जाधव (फोंडाघाट कॉलेज)
वजन घट 61 किलो
1) प्रथम-बाळू राजू जाधव (कासार्डे)
वजन गट 70 किलो
1) प्रथम- सुजल सत्यवान पाडाव (कणकवली कॉलेज)
वजन गट 74 किलो
1) प्रथम- सोहम संजय सावंत (कासार्डे)
वजन गट 79 किलो
1) प्रथम- सुरज प्रकाश शेलार (कासार्डे)
वजन गट 86 किलो
1) प्रथम- हंबीरराव जयसिंग देसाई (कासार्डे कॉलेज)
वजन गट 92 किलो
1) प्रथम- संकेत बाळू राठोड (कासार्डे कॉलेज)
*19 वर्षे गटातील मुली*
वजन गट 50 किलो
1) प्रथम- कस्तुरी राजाराम तिरोडकर (कणकवली कॉलेज)
2)द्वितीय- संध्या सुरेश पटकारे (कासार्डे कॉलेज)
3)तृतीय- करीना दिलीप डामरे (कासार्डे कॉलेज)
वजन गट 53 किलो
1) प्रथम – सीमा रमेश राठोड (कासार्डे कॉलेज)
2) द्वितीय- राखी संजय आलव (कासार्डे कॉलेज)
वजन गट 59 किलो
1)प्रथम- तृप्ती लक्ष्मण शेटये (कासार्डे कॉलेज)
वजन गट 62 किलो
1) प्रथम -तन्वी प्रकाश पवार (कणकवली कॉलेज)
*ग्रीको रोमन*
*19 वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात*
वजन गट 55 किलो
1) प्रथम- वैभव राजेश माने (कासार्डे ज्यु.कॉलेज)
या स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंचे सोमवार दि. 5 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून हे स्पर्धक त्या ठिकाणी कणकवली तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत. सर्व विजेत्या खेळाडूंचे व यशस्वी खेळाडूंचे तालुका समन्वयक बयाजी बुराण, प्राचार्य मधुकर खाड्ये, पर्यवेक्षक नारायण कुचेकर, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी अभिनंदन करून जिल्हा स्तरीय स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत.