*कोकण Express*
*खारेपाटण मध्ये गाव विकास पॅनलने प्रचाराचा केला शुभारंभ*
*सरपंचपदाच्या उमेदवार प्राची इस्वलकर सह सर्व ग्रा पं सदस्यांच्या विजयासाठी श्री कालभैरव, श्री देव केदारेश्वर रवळनाथ ला घातले साकडे*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
खारेपाटण ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा गाव विकास पॅनल ने शुभारंभ श्री कालभैरव श्रीदेव केदारेश्वर रवळनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. सरपंच पदासह सर्व ग्रा पं सदस्य बहुमताने विजयी होवो असे साकडेही घालण्यात आले. यावेळी गाव पॅनेल च्या सरपंच पदाच्या उमेदवार प्राची देवानंद इस्वलकर, ग्रा पं सदस्यपदाचे उमेदवार प्रणय गुरसाळे, अस्थाली पवार, निदा मुकादम,सुधाकर ढेकणे, शाहरुख काझी, गुरुप्रसाद शिंदे, सुहास राऊत, तृप्ती पाटील यांच्यासह गाव विकास पॅनल चे निमंत्रक मंगेश गुरव, प्रकाश आडविलकर, सचिन राऊत, अण्णा तेली, कालभैरव ट्रस्ट चे अध्यक्ष मधुकर गुरव, चंद्रमोहन शिंदे, चिन्मय शिंदे, संतोष बाणे, सचिन शिंदे, निनाद शिंदे, चैतन्य शिंदे, शुभांगी गुरव, प्राप्ती कट्टी, संदीप पाटील, बाब्या खांडेकर, सुरेश कांबळी, अनिल पवार, माधवी झगडे, अकबर मुकादम, मुजम्मिल मुकादम, यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.