*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात अखंड वाचन उपक्रम संपन्न*
*वाचनाने माणूस समृद्ध होतो*
प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले
*फोंडाघाट ःःप्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अखंड वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या उपक्रमात सलग चार तास विद्यार्थ्यांनी विविध वैचारिक पुस्तकांचे वाचन केले. या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्याचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले म्हणाले केले की जगातील मोठ्या व्यक्तींमध्ये एक साम्य असते ते म्हणजे त्यांचे प्रचंड वाचन असते आणि त्यामुळेच ते मोठे झालेले असतात. वाचनाने माणूस समृद्ध होतो. जगातील सर्व स्तरातील माणसांना माणूसपण देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 66 विषयांचा अभ्यास होता. दिवसाचे सोळा सोळा तास ते अभ्यास करत असत. अशा अफाट अभ्यास क्षमतेमुळेच ते भारतीय राज्यघटना लिहू शकले. त्यात त्यांनी सर्व समाजाचे सर्वांगीण हित पाहिले. खऱ्या अर्थाने मानव जातीचे उद्धार कर्ते होते. असे मत व्यक्त करून सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख प्रा. विनोदसिंह पाटील यांनी केले. तर आभार प्रा. नम्रता मंचेकर यांनी मानले. या उपक्रमात सुमारे 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.