*कोकण Express*
*कणकवलीत ग्रामपंचायत निवडणूक छाननीसाठी तुफान गर्दी..*
*५८ ग्रामपंचायतसाठी होत आहे निवडणूक ; गर्दीत अनेक उमेदवारांची लगबग..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्यातील सरपंच पदाचे उमेदवार व सदस्य पदाचे उमेदवार आज छाननी साठी उपस्थित होते. त्यामुळे कणकवली तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. तसेच निवडणूक विभागात त्या त्या गावाच्या टेबलवर आपला उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत वैद्य ठरविण्यासाठी उमेदवार सहभागी झाले होते. दुपारपर्यंत दहा ग्रामपंचायतीचे छाननी चे कामकाज पूर्ण झाले आहे. अद्यापही ४८ ग्रामपंचायतीची छाननी सुरू आहे. काही गावांमधील सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांच्या अर्जांवर विरोधी उमेदवारांनी आक्षेप नोंदवल्याचे चित्र आहे. मात्र निकाल देण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सायंकाळपर्यंत ही माहिती उपलब्ध होणार आहे.