*कोकण Express*
*कणकवली-करूळ ग्रामपंचायत सरपंच पदी भाजपच्या समृद्धी नर बिनविरोध*
*प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद ; मतदानापूर्वीच चार ग्रामपंचायती भाजपकडे बिनविरोध*
*सरपंच पदाचे ४ तर सदस्य पदाचे १८ उमेदवारी अर्ज ठरले अवैध*
*साकेडीत दोन सरपंच पदाचे अर्ज झाले बाद*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
कणकवली तालुक्यात ५८ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत तीन ग्रामपंचायतीतून सरपंच पदाचे चार उमेदवारी अर्ज आजच्या छाननीत अवैध ठरले.तर १८ सदस्यांचे अर्ज छाननी दरम्यान बाद झाले. या प्रक्रियेत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे करूळ ग्रामपंचायतीचे भाजपाचे सरपंच पदाचे उमेदवार समृद्धी संजय नर या बिनविरोध निवडून आला आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार माधवी मनोहर मिस्त्री यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला.भारतीय जनता पार्टीचे यापूर्वीचे तीन सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य निवडून निवडून आलेले आहेत. करूळ बिनविरोध झाल्याने भाजपकडे चार ग्रामपंचायती निवडणुकीपूर्वीच आल्या आहेत.
सरपंच सरपंच पदाचे अवैध ठरलेले उमेदवार अर्ज हळवल १,करूळ १,सकेडी २ असे चार जण आहेत तर अवैध ठरलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ग्रामपंचायत निहाय पुढील प्रमाणे असलदे १,बिडवाडी १,फोंडाघाट १,घोंसरी १,करंजे १, कुंभवडे १, तरळे १, माईन १ , वाघेरी १,वारगाव १,नांदगाव १, ओझरम २, साकेडी ५ असे आर्ज बाद झाले आहेत.
मतदानापूर्वीच चार ग्रामपंचायती भाजपकडे बिनविरोध आलेलेल्या आहेत. यापूर्वी शिडवणे ,वयगणी, ओझरम या ग्रामपंचायती बिनविरोध जनतेने भाजपा ला दिलेल्या आहेत. त्यात करूळ ची भर पडली आहे.

