पोलीस फ्युएल सेंटर कणकवली येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मनसे उभी राहणार

पोलीस फ्युएल सेंटर कणकवली येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मनसे उभी राहणार

*कोकण Express*

*पोलीस फ्युएल सेंटर कणकवली येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मनसे उभी राहणार*

*तर कामगारांच्या पिळवणुकी विरोधात प्रसंगी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन*

*मनसे रस्ते आस्थापना साधन सुविधा जिल्हा संघटक अमोल जंगले यांचा इशारा*

पोलीस कल्याण निधी अंतर्गत येणाऱ्या पोलीस फ्युएल सेंटर कणकवली येथील कर्मचाऱ्यांनी कंत्राटदार संस्थेच्या निषेधार्ह पुकारलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून कामगारांना व्यवस्थापनाने यावर तात्काळ तोडगा न काढल्यास प्रसंगी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले जाईल असा इशारा मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना जिल्हाध्यक्ष अमोल जंगले यांनी प्रसिद्धीद्वारे दिला आहे.मुळात नवीन निविदा प्रक्रिया करताना पोलीस अधिक्षक कार्यालयाने पगारात कपात नेमक्या कोणत्या निकषांद्वारे केली,निविदा प्रसिद्ध करतांना कामगार कायद्याचे पालन करणेबाबत अनास्था दाखवण्यामागे नेमके कोणाचे हितसंबंध जोपासले गेले, पगारात कपात करून कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण केलेबाबत स्वतः मा पोलीस अधीक्षक,सिंधुदुर्ग यांना कल्पना आहे का, निविदा प्रक्रिया घाईगडबडीत करण्यामागे नेमके कोणाचे हितसंबंध जोपासले गेले असे असंख्य सवाल उपस्थित होत आहेत.एकदंर हा सर्व प्रकार संशयाच्या भोवऱ्यात असून याची सखोल चौकशी होऊन कामगारांना वेळीच न्याय न मिळाल्यास प्रसंगी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले जाईल याशिवाय कर्मचाऱ्यांच्या बाजूने कामगार न्यायालयात दाद मागितली जाईल असा निर्वाणीचा इशारा श्री अमोल जंगले यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!