जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत कासार्डे विद्यालयाचे वर्चस्व

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत कासार्डे विद्यालयाचे वर्चस्व

*कोकण Express*

*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत कासार्डे विद्यालयाचे वर्चस्व*

*वेगवेगळ्या ईव्हेंटमध्ये विद्यालयाचे ०९ विद्यार्थी प्रथम*

*कासार्डे ; संजय भोसले*

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित, शालेय जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा नुकत्याच कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे पार पडल्या. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून सुमारे 80 च्या वर विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत मुलींची संख्या लक्षणीय होती.

योगासन स्पर्धा वेगवेगळ्या तीन गटात घेण्यात आल्या असून महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग चे टेक्निकल प्रमुख व सहसचिव संजय भोसले यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हास्तरीय योगा जज रवींद्र पावसकर ,श्वेता गावडे, नीता सावंत ,आनंद परब, प्रकाश कोचरेकर, तेजल कुडतरकर आणि क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड आदींच्या सहकार्याने स्पर्धा उत्कृष्ट रीतीने पार पडल्या.

*स्पर्धेला क्रीडा अधिकारी सौ. मनीषा पाटील यांनी उपस्थिती दर्शवून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या*

त्याचबरोबर महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव डॉक्टर तुळशीराम रावराणे, कासार्डे विकास मंडळाचे स्थानीय कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतडकर व प्रभारी मुख्याध्यापक नारायण कुचेकर यांनीही उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.

*स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे*

*14 वर्षाखालील मुली*
*प्रथम क्रमांक* दूर्वा प्रकाश पाटील. कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे. *द्वितीय क्रमांक* काव्य मुक्तानंद गोंडवळकर. पोतदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली *तृतीय क्रमांक* अनुष्का अभिजीत आपटे. पोतदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली *चतुर्थ क्रमांक* अस्मि सचिन राव ,डॉन बॉस्को हायस्कूल ,ओरोस *पंचम क्रमांक* सान्वी केशव कुऱ्हाडे, विद्या मंदिर हायस्कूल, कणकवली.

*14 वर्षाखालील मुले*

*प्रथम क्रमांक* कल्पेश उदय निकम. कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे. *द्वितीय क्रमांक* हर्षल प्रकाश कानूरकर. वराडकर हायस्कूल कट्टा, *तृतीय क्रमांक* नितेश उमेश घोगळे. वराडकर हायस्कूल कट्टा, *चतुर्थ क्रमांक* आयुष अवधूत बागवे. आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे, *पंचम क्रमांक* किसन मनोज देसाई. आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे,

*17 वर्षाखालील मुली*
*प्रथम क्रमांक* सानिका प्रवीण मत्तलवार .कासार्डे जुनिअर कॉलेज, *द्वितीय क्रमांक* संस्कृती सचिन मांजरेकर. मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला, *तृतीय क्रमांक* प्रज्योती श्रीकांत जाधव. विद्यामंदिर हायस्कुल कणकवली, *चतुर्थ क्रमांक* समृद्धी कुंडलिक माने. कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे, *पंचम क्रमांक* गौरी राघोबा मिटबावकर. वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा.

*17 वर्षाखालील मुले*
*प्रथम क्रमांक* प्रदीप भानुदास घाडगे. कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे, *द्वितीय क्रमांक* राजाराम चंद्रहास सावंत. न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूर.

*19 वर्षाखालील मुली*
*प्रथम क्रमांक* रिया विनायक नकाशे. कासार्डे जुनिअर कॉलेज. *द्वितीय क्रमांक* नेहा अजित पाताडे. कासार्डे ज्युनिअर कॉलेज. *तृतीय क्रमांक* कोमल शिवराम पाताडे. कासार्डे जुनिअर कॉलेज. *चतुर्थ क्रमांक* दीक्षा दिगंबर कदम .आवळेगाव हायस्कूल .*पंचम क्रमांक* मालिनी सचिन लाड .कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे.

*19 वर्षाखालील मुले*
*प्रथम क्रमांक* मयूर सुभाष हडशी. कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे.

*आर्टिस्टिक व रिदमिक मधील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी*

*14 वर्षाखालील मुले*
कल्पेश उदय निकम .(आर्टिस्टिक मध्ये ) कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे.

*17 वर्षाखालील मुली*
गार्गी चंद्रकांत परळकर. विद्यामंदिर हायस्कूल (आर्टिस्टिक मध्ये)
सानिका प्रवीण मतलवार. कासार्डे ज्यु. काॅलेज कासार्डे. (रिदमिक मध्ये)

*19 वर्षाखालील मुली*
रिया विनायक नकाशे. कासार्डे जुनिअर कॉलेज (रिदमिक मध्ये)

हे सर्व खेळाडू कोल्हापूर (इचलकरंजी) येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचे नेतृत्व करणार असून ,क्रीडा अधिकारी सौ. मनीषा पाटील, महाराष्ट्र योगासना स्पोर्ट्स असोसिएशन सिंधुदुर्गचे सचिव, तुळशीराम रावराणे. सहसचिव, संजय भोसले .सदस्य, प्रकाश कोचरेकर. श्वेता गावडे .रवींद्र पावसकर. कासार्डे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक ,नारायण कुचेकर .आदींनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .या सर्व खेळाडूंचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!