*कोकण Express*
*मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पत्रकार भवनाचे लोकार्पण*
*६ जानेवारीला होणार लोकार्पण सोहळा*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा ६ जानेवारीला होत आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकीत देण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, सचिव देवयानी वरस्कर, खजिनदार संतोष सावंत, उपाध्यक्ष महेश सरनाईक, बंटी केनवडेकर, बाळ खडपकर, कार्यकारणी सदस्य दीपेश परब, राजन नाईक, हरिश्चंद्र पवार, संतोष राऊळ यांची आदी उपस्थिती होते.
या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाची एक समिती जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे जाऊन येथील मान्यवरांना निमंत्रित करणार आहे. जिल्ह्यातील पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना ओळखपत्रे मिळण्यासाठी संघाचे कार्यकारी सदस्य राजन नाईक यांच्या हॉटेल आरएमएन कुडाळ यांच्याकडे आपापली आधार कार्ड झेरॉक्स व फोटो यांच्याकडे १० डिसेंबर पर्यंत द्यायचे आहेत, असा ठराव या बैठकीमध्ये आपल्याच्या विषयामध्ये घेण्यात आला. दरम्यान ओळखपत्र शिवाय उद्घाटन कार्यक्रमास प्रवेश मिळणार नसल्यामुळे दिलेल्या तारखेला आपले ओळखपत्रासाठी लागणारे कागदपत्र देण्याचे आवाहन अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी केले, तसेच सभासदांनी आपती सभासद फी ३० डिसेंबरपर्यंत खजिनदार संतोष सावंत यांच्याकडे जमा करायची आहे, असाही ठराव घेण्यात आला.
या बैठकीमध्ये कणकवली- देवगडचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार संघाच्या या भवनासाठी लागणारी मदत आणि सहकार्य केल्याबद्दत त्यांचा अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला. संघाचे कार्यकारी सदस्य राजन नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स राज्य पर्यटन समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनावा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर पत्रकार भवनाच्या स्वप्रपूर्तीचे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांचाही अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची प्रसिद्धी करण्यासाठी हरिश्चंद्र पवार यांची निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये कार्यकारणी सदस्य संतोष राऊळ, राजन नाईक, बंटी केनवडेकर, नंदकिशोर महाजनी यांनी सहभाग घेतला.