*कोकण Express*
*देवगड तालुक्यातील आरे गावातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश*
*आमदार नितेश राणे देवगड विभागातही पक्ष प्रवेशाचे फोडले फटाके*
*निवडणुकीच्या तोंडावर सलग अकराव्या दिवशी प्रवेशाची रांग*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा धूम धडाका लावलेला असताना.देवगड विभागातील आरे गावातील सतीश कदम ममता कदम शामसुंदर कदम, रामकृष्ण कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. यांचा राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मानला जात आहे.आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे ओम गणेश निवस्थानी पक्षात स्वागत केले.
यावेळी नितीन कदम पांडुरंग कदम संतोष कदम भाऊ कदम संदीप साटम अमित साटम संतोष फाटक व भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी,आदी उपस्थित होते.