*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एएनएमच्या 21 परिचारिकांना सेवेत कायम*
*परिचारिकांनी आमदार नितेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत*
*खारेपाटण प्रतिनिधी*
कोरोना महामारी आरोग्य व्यवस्था ढासळली होती. परिचारिका आणि डॉक्टर जीवाची बाजी लावत काम केले. या काळात कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या शेकडो परिचारिकांना दिलासा मिळाला आहे. या परिचारिका ११ महिन्याच्या करार केला होता. व तो करार संपुष्टात आल्यावर परिचारिकांना घरी बसावे लागले होते. आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करून परिचारिकांना न्याय मिळवून दिला.
त्याबद्दल सर्व परिचारिकांनी ओम गणेश निवासस्थानी येऊन आमदार नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.