मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निमित्ताने कणकवलीच्या आसपास परवानगी घेऊन लावलेले स्वागताचे बॅनर अज्ञातांनी आकसाने काढले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निमित्ताने कणकवलीच्या आसपास परवानगी घेऊन लावलेले स्वागताचे बॅनर अज्ञातांनी आकसाने काढले

*कोकण Express*

*मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निमित्ताने कणकवलीच्या आसपास परवानगी घेऊन लावलेले स्वागताचे बॅनर अज्ञातांनी आकसाने काढले….*

*मनसेच्या अमित घाडी यांचा आरोप*

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागता साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसे लॉटरी सेनेमार्फत जवळपास 250 बॅनर जिल्ह्यात लावण्यात आले. मनसे लॉटरी सेनेचे तालुका अध्यक्ष अध्यक्ष अमित घाडी यांनी स्वतः रात्रभर जागून हे बॅनर लावले होते व त्याची नगरपंचायत जवळून रीतसर लेखी परवानगी घेऊन शुल्क भरले होते. पण काल ओरस ठिकाणी जात असताना कणकवली च्या आसपास लावलेले बॅनर गायब दिसले.मनसेचे इंजिन हिंदुत्वाच्या ट्रॅक वर सुसाट असल्यामुळे बेगडी हिंदुत्व वाल्यांच्या पाया खालची वाळू सरकल्या मुळे बॅनर काढण्यात आले. अशा विरोधकांना मनसे जशास तसे उत्तर देईल असे अमित घाडी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!