*कोकण Express*
*कणकवली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालय, वारगाव प्रशालेचे निर्विवाद वर्चस्व*
*कासार्डे;संजय भोसले*
कनेडी येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील कणकवली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मुलांचा आणि मुलींचा संघ विजेता ठरला.
अंतिम सामन्यात फोंडाघाट हायस्कूलवर निर्विवाद विजय मिळवून मुलांचा संघ विजेता ठरला. आणि मुलींचा अंतिम सामना यजमान कनेडी हायस्कूल विरुद्ध झाला. या सामन्यात मुलींच्या संघाने कनेडी हायस्कूलवर विजय मिळवला. दोन्ही संघाची जिल्हा क्रीडा संकुल ओरस येथे जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळण्यासाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री चंद्रकांत कानकेकर सर यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष श्री शांताराम ब्रम्हाशेठ केसरकर, सरचिटणीस मुंबईचे नगरसेवक श्री अनंत उर्फ बाळासाहेब नर, कार्याध्यक्ष विजय केसरकर, मुख्याध्यापक वाळके सर, सर्व शिक्षक, कर्मचारी, सरपंच, उप सरपंच, शाळा समिती पदाधिकारी या सर्वानी अभिनंदन केले.