*कोकण Express*
*शहरातील प्रभाग ८ मधील विकासकामांचे आज करण्यात आले उद्घाटन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील विकास कामांचा आज नगरसेवक आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचा हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.
यावेळी सर्वोदय नगर येथील शिक्षक कॉलनी कामत घर ते पत्रकार गजानन नाईक घरापर्यंत रस्त्यांच्या पृष्ठभागाचे नुतनीकरण करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर समोर हायवेला लागून गटार बांधकाम करणे, अली पाणंद रस्ता ते सावंत गुरुजी घरापर्यंत रस्ता कॉक्रिटिंग करणे, सर्वोदय नगर येथील दुबळे यांच्या घरासमोरील खुल्या जागेत उद्यान विकसित करणे, पाटणकर घरापासून मुशताफ राजगुरू यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करून गटार बांधकाम करणे या पाच कामांचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. ही कामे अँड परिमल नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर करण्यात आली आहेत.
यावेळी नगरसेविका भारती मोरे, नगरसेविका माधुरी वाडकर, गजानन नाईक, अशोक देसाई, बाळ बोर्डेकर, सतीश नाईक, तानाजी पालव, अजय गोंदावळे, कळकुंद्रिकार, मुरगूड, बारदेस्कर, विशाल सावंत, उमेश पाटणकर, माजी नगरसेवक तानाजी वाडकर, यतीन तावडे, आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते