युनिक अकॅडमी कणकवलीची विद्यार्थिनी सुरभी कडुलकर बनली सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर

युनिक अकॅडमी कणकवलीची विद्यार्थिनी सुरभी कडुलकर बनली सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर

*कोकण Express*

*युनिक अकॅडमी कणकवलीची विद्यार्थिनी सुरभी कडुलकर बनली सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर*

*युनिक अकॅडमी कणकवलीची विद्यार्थिनी सुरभी कडुलकर बनली सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर*

*कणकवली ः प्रतिनिधी* 

मालवण तालुक्यातील रामगड गावची सुकन्या सुरभी सुरेश कडुलकर हिने एम पी एस सी च्या सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर परीक्षेत यश संपादन करून क्लास टू ऑफिसर पद मिळवले आहे.

युनिक अकॅडमी कणकवली येथे 2018 साली स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेश घेतल्यानंतर तीने अथक परिश्रम घेत अभ्यास सुरु ठेवला.कोरोनो च्या परिस्थिती मुळे 2 वर्षे स्पर्धा परीक्षा लंबणीवर पडल्या होत्या. त्या परिस्थतीवर जिद्दीने मात करत अभ्यासातलं सातत्य आणि मनावरचा संयम कायम ठेवून तीने हे यश मिळवले आहे. 2021 साली जाहीर झालेल्या एसटीआय परीक्षेचा अंतिम निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला. यात सुरभी हिने सुयश मिळवत सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर ची क्लास टू ऑफिसर ची पोस्ट मिळविली आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने युनिक अकॅडमी कणकवली सातत्याने कार्यरत असून अनेक विद्यार्थी आज सरकारी सेवेत आहेत . क्लास टू ऑफिसर झालेल्या सुरभी कडुलकर हिच्या यशाने जिल्ह्या मध्ये हा पुन्हा एकदा विश्वास निर्माण झाला आहे की, पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. आपल्या गावातच राहून ही यश मिळवता येते. तेंव्हा जिल्ह्यातील विद्यार्थी पालक यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळले पाहीजे तेंव्हाच आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे असे मत युनिक अकॅडमी कणकवली चे संचालक सचिन कोर्लेकर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!