कणकवली तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी १२८ जणांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र

कणकवली तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी १२८ जणांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र

*कोकण Express*

*कणकवली तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी १२८ जणांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र*

*सरपंच पदासाठी २१ तर सदस्य पदासाठी १०७ जणांचे नामनिर्देशन पत्र दाखल;ग्रा. प. निवडणूक निर्णय अधिकारी आर. जे. पवार यांची माहिती*

*कणकवली ः प्रतिनिधी*

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी २१ तर सदस्य पदासाठी १०७ एकूण १२८ जणांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली.आतापर्यंत सरपंच पदासाठी ३१ तर सदस्य पदासाठी १२९ एकूण १६० जणांचे नामनिर्देशन दाखल झाले आहे.

२ डिसेंबर पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असून, सकाळी ११ ते दुपारी ३ असा वेळ देण्यात आला आहे. कणकवली तहसीलदार सायंकाळपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. बुधवारी दाखल झालेल्या नामनिर्देश पत्रात असलदे सरपंच पदासाठी ३ अर्ज,सदस्य पदासाठी ९, बिडवाडी सरपंच १ अर्ज,फोंडाघाट सरपंच १ अर्ज,सदस्य १ अर्ज, हरकुळ बुद्रुक सरपंच पदासाठी २ अर्ज,सदस्य २० अर्ज, कलमठ सदस्य ५ अर्ज, करुळ सदस्य २ अर्ज, कसवण – तळवडे सरपंच १ अर्ज, सदस्य ८ अर्ज,खारेपाटण सरपंच पदासाठी १ अर्ज,सदस्य ७ अर्ज,कोळोशी सरपंच पदासाठी १ अर्ज,सदस्य १ अर्ज, कोंडये सरपंच पदासाठी १ अर्ज,सदस्य २ अर्ज ,कुंभवडे सदस्य १ अर्ज,नागवे सदस्य १ अर्ज,नांदगाव सरपंच पदासाठी १ अर्ज,सदस्य ७ अर्ज,नरडवे सरपंच १ अर्ज ,नाटळ सरपंच १ अर्ज,सदस्य ९ अर्ज, पियाळी सरपंच २ अर्ज,सदस्य २ अर्ज,सांगवे सदस्य २ अर्ज, सावडाव सदस्य २ अर्ज, शिरवल सदस्य १ अर्ज,शिवडाव सदस्य १० अर्ज, तळेरे सदस्य २ अर्ज, तरंदळे सदस्य १ अर्ज,वागदे सरपंच १ अर्ज,सदस्य ९ अर्ज, वाघेरी सरपंच २ अर्ज,सदस्य ६ अर्ज, वारगाव सरपंच १ अर्ज,

बुधवारी सदस्य पदासाठी १०७ आणि सरपंच पदासाठी २१ मिळून १२८ उमेदवारांनी नामनिर्देश सादर केले आहे.आतापर्यंत १६० अर्ज दाखल झाले आहेत.शेवटच्या २ दिवसांत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!