आंबोलीत भारतदास महाराज यांची २ रोजी पुण्यतिथी

आंबोलीत भारतदास महाराज यांची २ रोजी पुण्यतिथी

*कोकण Express* 

*आंबोलीत भारतदास महाराज यांची २ रोजी पुण्यतिथी..*

*आंबोली ःःप्रतिनिधी* 

परमपूज्य सद्गुरू भारतदास महाराज मठ व माऊली मंदिर सेवा ट्रस्ट राघवेश्वर आंबोली या न्यासतर्फे प. पू. सद्गुरू भारतदास महाराज यांच्या २३ व्या पुण्यतिथीचे २ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित ट्रस्टच्यावतीने आंबोली राघवेश्वर मठ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ व २ डिसेंबर रोजी हा सोहळा होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे.

१ रोजी रात्री भजन, कीर्तन, प्रवचन, गायन, पहाटे काकड आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. २ डिसेंबर रोजी स्वयंभू गणेश मंदिरात अभिषेक, भारतदास महाराज समाधी स्थळावर मूर्तीस महाअभिषेक, १२ वाजता महाआरती, पालखी सोहळा त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यासाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!