देवगड, मालवण, कणकवली तालुक्यात स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन : विद्यार्थ्यांना मोफत मिळणार मार्गदर्शन

देवगड, मालवण, कणकवली तालुक्यात स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन : विद्यार्थ्यांना मोफत मिळणार मार्गदर्शन

*कोकण Express*

*देवगड, मालवण, कणकवली तालुक्यात स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन : विद्यार्थ्यांना मोफत मिळणार मार्गदर्शन*

*कासार्डे: संजय भोसले*

मुंबई सीमाशुल्क विभागातील अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांचे 2 ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत देवगड, मालवण, कणकवली तालुक्यातील विविध ठिकाणी स्पर्धा परिक्षा व करिअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन मोफत असून विद्यार्थांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सत्यवान रेडकर हे तिमिरातून तेजाकडे या उपक्रमांतर्गत संपूर्ण कोकणात मोफत स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन करतात. आजपर्यंत अनेक शाळांवर शेकडो व्याख्याने देण्यात आली असून आपल्याकडेही शासकीय कर्मचार्यांचे गाव निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

यासाठी यावेळी 2 ते 4 डिसेंबर ला या निशुल्क मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 2 डिसेंबरला देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, फणसगाव येथे सकाळी 8.30 ते 11.30 वा., दुपारी 2 वा. माध्यमिक विद्यालय, तळेबाजार येथे दि. 3 डिसेंबर ला देवगड तालुक्यातील पुन्डलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय, शिरगाव येथे सकाळी 9 वा., कणकवली तालुक्यातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कळसुली येथे दुपारी 1 वा., दि. 4 डिसेंबर ला मालवण तालुक्यातील आर. पी. बागवे विद्यालय मसुरे येथे सकाळी 9 ते 11 वा. तर दुपारी 3 वा. श्री शिवाजी विद्यामंदीर काळसे येथे हे व्याख्यान होणार आहे.

या निशुल्क मार्गदर्शनाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!