*कोकण Express*
*निरोगी जीवन जगण्यासाठी योगसाधनेत सातत्य ठेवा : प्रभाकर कुडतरकर*
*कासार्डेतील शालेय जिल्हास्तरीय योगा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात आवाहन*
*कासार्डे: संजय भोसले*
प्राचीन काळापासून भारतातील ऋषीमुनींनी योग विद्येचा अभ्यास करून जगाला देणगी दिली आहे. क्रोधावर नियंत्रण करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारी योग साधना आहे.निरोगी जीवन जगण्यासाठी प्राणायाम व योगसाधनेत सातत्य ठेवणे काळाची गरज आहे असे आवाहन कासार्डे शिक्षण संस्थाचे स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांनी योगा स्पर्धेतील खेळाडूंना केले.
क्रीडा व युवक सेवा संचलन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय योगा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर प्र. प्राचार्य यांची एन.सी. कुचेकर,प्र.पर्यवेक्षक एस.डी. भोसले, पंच -प्रकाश कोचरेकर, रवींद्र पावसकर, सौ.श्वैताता गावडे, सौ.निता सावंत, आनंद परब,कु. तेजल कुडतरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून आणि ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शानदार उद्घाटन झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत प्र.प्राचार्य एन.सी.कुचेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
स्पर्धेला क्रीडा शिक्षक श्री.कानूरकर( कट्टा )नरेंद्र पाटकर कोर्ले- धालवली अर्चना देसाई (पेंढूर हायस्कूल) आणि शर्मिला केळूसकर (विद्यामंदिर हायस्कूल कणकवली), प्रियंका सुतार,अवधूत कानकेकर (कासार्डे हायस्कूल) आदी उपस्थित होते.
याप्रसंगी योगपंच संजय भोसले,सौ.श्वेता गावडे ,प्र.मुख्याध्याक एस.सी. कुचेकर यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.आभार संजय भोसले यांनी मानले.या जिल्ह्यास्तरीय योगा स्पर्धेला जिल्हातील विविध माध्यमिक शाळेतील खेळाडूंनी हजेरी लावली असून ,ही स्पर्धा कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या डीजीटल हाॅल मध्ये सलग दोन दिवस सुरू राहणार आहे.