मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वागत

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वागत

*कोकण Express*

*मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वागत*

*मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती*

मनसे पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौऱ्यावर
येत असून पक्ष संघटना आढावा घेणार आहेत 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कोल्हापूरहुन जिल्ह्यात दाखल होत असून दि 01 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 11.30 वाजता कुडाळ तालुका पक्ष संघटनेचा आढावा मराठा समाज हॉल येथे घेणार आहेत. तद्नंतर जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत विविध शिष्टमंडळांशी चर्चा करणार असून पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहेत. तरीही तालुक्यातील मनसेच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी,महाराष्ट्र सैनिकांनी व मनसे प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!