*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांनी घेतले परमहंस भालचंद्र महाराज समाधी स्थळाचे दर्शन*
परमहंस भालचंद्र महाराज समाधी स्थळाचे भाजपा आमदार नितेश राणे दर्शन घेतले.प. पू भालचंद्र महाराज संस्थानच्या वतीने पुण्यतिथीनिमित्त आयोजित महोत्सव आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील समाधी स्थळे जाऊन नतमस्तक होत दर्शन घेतले. तर अखंड सुरू असलेल्या महाप्रसादाचा सुद्धा आमदार नितेश राणे यांनी लाभ घेतला.यावेळी संस्थांचे अध्यक्ष सुरेश कामत यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी विश्वस्त आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.