*कोकण Express*
*माणगाव खोऱ्यात जत्रोत्सवाच्या नावाखाली जुगाराच्या बैठकी जोरात तर,पोलीस प्रशासन सुशागात*
*स्थानिक खाकी वर्दीला हाताशी धरून जुगाराच्या बैठकांचे केले जाते आयोजन,जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे लक्ष घालणार काय?*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हात जत्रोत्सव सुरू झाले आणि जुगाराच्या बैठका ह्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.जत्रोत्सवास जुगारांवर बंदी आल्यानंतर जत्रांमधील गर्दी कमी झाली व्यापार कमी झाला असा एक मतप्रवाह तयार झाला.जत्रोत्सव म्हणजे धार्मिक विषय परंतु कोणत्याही सणाचे उत्सवाचे औचित्य साधून आपली पोळी भाजून घेणारे अवैध व्यवसाय करणारे नवनवीन फटाके फोडतात आणि जुगाराचे समर्थन करतात जुगारांमुळे जत्रा भरतात असं सांगून काही स्थानिक जुगार खेळणारे व स्थानिक खाकी वर्दीच्या अंमलदाराना हाताशी धरून जत्रोत्सवास जुगाराच्या मैफिली बसवतात ज्या गावात जत्रोत्सव असतो तेथील आजूबाजूच्या बागांमध्ये जंगलात,कुंपणात चार्जिंग दिव्याच्या व मेणबत्तीच्या साहाय्याने जुगार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
गावा गावातील जत्रोत्सवाच्या नावाखाली रात्रीच्या वेळी जुगाराची पाल टाकली जातात तरुण, युवाई “घुडघुड्या” व “लाल -काला” पासून जुगाराचे होणारी सुरुवात अन् “अंदर-बाहर” तीन पत्त्याच्या डावावर बसते तरुण पिढी जास्त पैसे मिळविण्याच्या नादात आपले आयुष्य बरबाद करतात खिशातले पैसे संपले की कुणाच्या खिसा साफ करून जुगार खेळणे ही सवय लावतात जिल्ह्यातील तरुणाई बरबाद करणारे तसेच लोकांचे संसार उध्वस्त करणारे जत्रोत्सातील जुगार कायमस्वरूपी बंद होतील काय? की हे खाकीच्या आशीर्वादाने सुरू असलेले जुगार असेच सुरू राहतील काय? या सर्व घटनांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अग्रवाल साहेब कोणत्या नजरेने पाहतात आता बघावे लागेल.