*कोकण Express*
*कणकवली तालुक्यातील करंजे गावातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश*
*आमदार नितेश राणे यांनी हरकुळ बुद्रुक विभागातही पक्ष प्रवेशाचे फोडले फटाके*
*निवडणुकीच्या तोंडावर सलग दहाव्या दिवशी प्रवेशाची रांग*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा धूम धडाका लावलेला असताना. हरकुळ बुद्रुक विभागातील करंजे गावातील संदीप विठ्ठल मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. यांचा राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मानला जात आहे.
आमदार नितेश राणे यांनी त्यांचे ओम गणेश निवस्थानी पक्षात स्वागत केले. संदीप विठ्ठल मेस्त्री, सपना संदीप मेस्त्री योगेश शामसुंदर दळवी, शितल योगेश दळवी .
यावेळी करंजे गावचे सरपंच मंगेश तळगावकर बूथ कमिटी अध्यक्ष तुकाराम परब तंटामुक्ती अध्यक्ष राजेश परब व भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी,आदी उपस्थित होते.