*कोकण Express*
*प्रोफेशनल स्कीलअपग्रेडेशन प्रशिक्षणात कासार्डेच्या चंद्रकांत झोरेंचा राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक*
*कासार्डे;संजय भोसले*
कासार्डे,तळेरे पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यानी नागपूर येथिल प्रोफेशनल स्किल अपग्रेडेशन या राज्यस्तरीय प्रशिक्षणात व्दितीय क्रमांक पटकाविला आहे.राज्यातील सहभागी 300 पोलीसामधून व्दितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सर्वच स्तरावर कौतुक होत अभिनंदन केले जात आहे.
नागपूर येथे झालेल्या या प्रशिक्षण शिबीरात राज्यातील 300 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये सिंधुदुर्गतून 6 पोलीस कर्मचारी या शिबीरात सहभागी होत उल्लेखणीय कामगिरी बजविली.यातील देवगड तालुक्यातील पोंभूर्ले गावचे सुपुत्र व सध्या कणकवली पोलीस स्टेशन अंतर्गत कासार्डे ,तळेरे पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस हवालदार श्री.चंद्रकांत झोरे यांनी 150 पैकी 132 गुण मिळवत घवघवीत यश संपादनकेले.यापूर्वीही नाशिक येथे झालेल्या गुन्हे दोषसिध्द प्रमाण वाढविण्याच्या प्रशिक्षण प्रथम क्रमांक मिळवला होता. तरी या यशाबद्दल प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रामेश्वर पिंपरेवार यांच्या हस्ते रोख रक्कम,पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.