*कोकण Express*
*नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना भाजपा पक्ष प्रवेशासाठी देण्यात आली भाजपा पक्षाच्या नगरसेविका माने यांच्यामार्फत आम. राणे यांच्याकडून धमकी*
*नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांची देवगड पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड जामसंडे नगरपंच्यातीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना भाजपा पक्ष प्रवेशासाठी देण्यात आली भाजपा पक्षाच्या नगरसेविका प्रणाली माने यांच्यामार्फत आमदार नितेश राणे यांच्याकडून धमखीची ऑफर देवगड जामसंडे नगरपंच्यातीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना धमखावून भाजपा मध्ये प्रवेश करा असे संगण्यात आले. या बाबतची तक्रार नगरपंच्यातीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी लेखी निवेदणाद्वारे देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.
या निवेदनामध्ये असे म्हटले आहे कि,मी साक्षी गजानन प्रभू, रा. तारामुंबरी देवगड शहराची नगराध्यक्ष आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडून आली आहे. मागील काही दिवसापासून भाजप नेते व देवगडचे आमदार नितेश नारायण राणे यांच्याकडून व त्यांच्या कार्यकत्यांकडून माझ्यावर मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून भाजप पक्षामध्ये प्रवेश करावा असा दबाव टाकला जात होता. प्रथम काही दिवस मी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते. तथापि दिनांक – 7/11/2022रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास माझ्या राहत्या घरी भाजप नगरसेविका प्रणाली माने व त्यांचे पती श मिलिंद माने हे दोघे आले होते सदर इसमांनी मला त्यांच्या मोबाईल वरून आमदार राणे यांच्याशी बोलणे करून दिले. त्या वेळेस आमदार राणे यांनी मला धमकी दिल्ली कि तुम्ही पुढील १० दिवसात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडून भाजप पक्षात प्रवेश करावा. अन्यथा आम्ही तुम्हाला बदनाम करायला सुरुवात करणार आहोत. मी त्यांना कारण विचारले असता त्यांनी मला सांगितल कि तुम्ही खोटी बिले काढली आहेत असा मी आरोप करणार आहे व त्यात तुम्हाला आणि तुमच्या बाकीच्या नगरसेवकांना अडकवणार असे मला सांगितले. तसेच तुम्ही भाजप मध्ये आल्यास तुम्हाला २५ लाख रुपये देऊ शिवाय नगराध्यक्षपद हि देऊ अशी मला ऑफर दिली होती. परंतु मी त्यांना स्पष्ट नकार दिला होता. मला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एकनिष्ठ राहायचे आहे असे मी माने दाम्पत्याला सांगितले असता त्यांनी सुद्धा मला तुमच्या जीवाचे बरे वाईट होईल असे सांगितले. सदर प्रकार नंतर माने तिथून निघून गेल्या. त्यानंतर दि. २४/११/२०२२ रोजी मला रात्री १०.०५ आणि १०.१० या वेळेला मला एका अनोळखी व्यक्ती चा दोन वेळा मिस्ड कॉल आले होते.त्यानंतर त्याच नंबर वरून मला शुक्रवार दिनांक २५/११/२०२२ रोजी सकाळी १०.०५ वाजता कॉल आला होता तो मी घेतला असता त्या नंबर वरून आमदार राणे माझ्याशी बोलत होते. त्यांनी माझ्याकडे माझ्या आजारी असलेल्या मुलीची चौकशी करणे सुरु केले. मला त्यांच्यापर्यंत माझ्या मुलीच्या आजारपणाची माहिती कशी समजली याचे आश्चर्य वाटले. मला त्यांच्या बोलण्याचा संशय आला व प्रचंड घाबरायला हि झाले. या सर्व प्रकारा वरून मला आता अशी भीती वाटू लागली आहे कि माझ्या कुटुंबियांना आणि मला जोविताची भीती वाटू लागली आहे. आमच्या जीवाचे काहीही बरे वाईट झाल्यास त्याला आमदार नितेश राणे, नगरसेविका प्रणाली माने आणि मिलिंद माने यांना जबाबदार धरण्यात यावे. वरील आलेल्या नंबर ची मी खात्री केली असता ते नंबर आमदार नितेश राणे यांच्या वापरातील असल्याचे मला व्हॉटसअप आणि टुकॉलर वरून आढळून आले.
आमदार राणे आणि त्यांचे कार्यकर्ते माझ्यावर आणि माझ्या मुलीवर पाळत ठेऊन आहेत असे आता मला वाटू लागले आहे. मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडून भाजप मध्ये जात नाही याचा राग माझ्यावर काढण्यासाठी सदरचे प्रकार केले जात आहेत.
तरी आता माझी आपणाला अशी नम्र विनंती आहे कि आपण मला घरी येऊन धमकी दिल्या प्रकरणी तसेच माझ्या वरील मोबाईल वर कॉल करून मला पक्ष सोडायला दबाव टाकल्याप्रकरणी आमदार नितेश राणे, नगरसेविका प्रणाली माने आणि मिलिंद माने यांच्यावर एका महिलेच्या घरी जाऊन धमकी दिल्या प्रकरणी तसेचः मोबाईल वरून संभाषण करून पक्ष सोडायला दबाव टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. तसेच आमच्या जीवाचे काहीही बरे वाईट झाल्यास त्याला आमदार नितेश राणे, नगरसेविका प्रणाली मानें आणि मिलिंद माने यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी या निवेदणाद्वारे नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी केली आहे.