मुंबई – गोवा महामार्गावर दोन वाहनांची समोर समोर धडक

*कोकण Express*

*मुंबई – गोवा महामार्गावर दोन वाहनांची समोर समोर धडक*

*सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही*

कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई गोवा महामार्गावर हुंबरठ नजीक उषा वहिनी मसाले समोर कंटेनर व डंपरची समोरासमोर धडक बसुन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात आज दुपारी ०१.०० वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातातील मेडिसीनची वाहतुक करणारा कंटेनर कणकवलीच्या दिशेने येत होता. तर केसीसी बिल्डकॉनचा डंपर खारेपाटणच्या दिशेने जात असताना, हुंबरठ येथे महामार्गावर हा अपघात घडला. अपघाताच्या आवाजाने तेथील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले. अपघाताचे स्वरूप पाहता सुदैवाने जीवित हानी टळली आहे. चालकांना किरकोळ दुखापत झाली. मात्र दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान महामार्ग वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतुक सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!