दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ* *इंडिया तथा भारतीय बौध्द

दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ* *इंडिया तथा भारतीय बौध्द

*कोकण Express*

*दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ* *इंडिया तथा भारतीय बौध्द*

*महासभा (राष्ट्रीय अध्यक्ष आद . राजरत्न आंबेडकर ) यांच्यावतीने*
संविधान दिन साजरा*

*कासार्डे; संजय भोसले*

दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आद राजरत्न आंबेडकर या संस्थेच्या शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने संस्थाध्यक्ष *आद विद्याधर कदम यांचे अध्यक्षतेखाली *संविधान दिन* जिल्हा संपर्क कार्यालय पारकर बिल्डींग ओरोस येथे संपन्न झाला . यावेळी मार्गदर्शक म्हणून *मा .दिपक म्हालटकर* (वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग). *विधीज्ञ मा .अश्पाक शेख* , *मा. मठकर* ( अधीक्षक , न्यायालय) उपस्थित होते.
मान्यवरांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पन करण्यात आला सामूदायिक त्रिसरण पंचशील ग्रहन केल्या नंतर उपस्थितांनी सामूहीक संविधान उद्देशिकेचे वाचन केले व महापुरुषांना मानवंदना दिली . प्रास्ताविकात जिल्हा उपाध्यक्ष *मा. सुधीर धामणकर* यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करून संविधानाचे महत्व सांगितले .
यावेळी वरिष्ठ न्यायधीश म्हालटकर साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय संविधान हा भारतीयांचा धर्मग्रंथच असूच त्याचे महत्व व त्याचा प्रसार व प्रचार गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे , संविधानाच्या कलमाची ओळख प्रत्येक व्यक्तीला व्हावी, गोरगरिबांचा विकास व्हावा त्यासाठी शैक्षणिक व आर्थिक सबळ व्यक्तींनी प्रयत्न करावा.
मा . अश्पाक शेख साहेबांनी संविधानातील अनुच्छेद मधील आपले अधिकार व कर्तव्ये यांची माहिती सांगीतली तर मा . मठकर यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विद्याधर कदम यांनी सर्व उपस्थितांना धन्यवाद देऊन संस्थेच्यावतीने आम्ही संविधान साक्षरता अभियान हा उपक्रम राबवून संविधान शाळा , कॉलेज , प्रत्येक घरापर्यंत पोहोचवू असे सांगितले . यावेळी जिल्ह्यातील जिल्हा , उपविभाग , तालुका , शहर शाखा पदाधिकारी ,सदस्य व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा महासचिव *आयु .ए .डी . कांबळे* यांनी तर आभार जिल्हा कोषाध्यक्ष *आयु . नंदकुमार कासले* यांनी केले .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!