*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर*
*गावडे,परब परांजपे, साटम, उचले, देसाई आदींचा पुरस्कारात समावेश…*
*सहा जानेवारीच्या पत्रकार दिनाच्य दिवशी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण*
*ओरोस,ता.२४:*
सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत.
यात आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक तुरूण भारत चे मुख्यालय प्रतिनिधी संदीप गावडे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे वेंगुर्ला प्रतिनिधी दिपेश परब यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून आदर्श पत्रकार पुरस्कार महादेव परांजपे यांना, ग्रामीण भागासाठी दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार लोकमतचे शिरगाव येथील प्रतिनिधी दिनेश साटम यांना व उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार कणकवलीचे अनिकेत उचले यांना जाहीर झाला आहे. तर कै अरविंद शिरसाट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यावर्षी दोडामार्गमधील तेजस देसाई यांना जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर झाला आहे
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे सचिव उमेश तोरस्कर यांनी गुरूवारी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीनंतर बैठकीनंतर या पुरस्कारांची घोषणा केली. सहा जानेवारीच्या पत्रकार दिन समारंभात ओरोस येते मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावर्षी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत आदर्श पत्रकार पुरस्कारांची निवड करण्यात आली. यावेळी कार्यकारिणीचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते