*कोकण Express*
*आ. नितेश राणे यांचे प्रयत्न फळाला ,कुणकेश्वर मंदिर ते तारामुंबरी मिठमुंबरी पूल हा रस्ता झाला प्रमुख जिल्हा मार्ग*
कुणकेश्वर मंदिराकडून तारामुंबरी मिठमुंबरी पुलाकडे येणारा रस्ता हा सर्वात जास्त वाहतुकीचा रस्ता आहे कारण या रस्त्यामुळे देवगड व कुणकेश्वर यातील अंतर खूपच कमी आहे मात्र हा रस्ता विकसित करायचा असेल तर त्याच्या दर्जाचा प्रश्न निर्माण होत होता
या रस्त्याचा दर्जा इतर जिल्हा मार्ग म्हणून होता आमदार नितेश राणे यांनी याबाबत जोरदार प्रयत्न करून या या रस्त्याची दर्जोन्नती केली असून तो आता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून गणला जाणार आहे विशेष म्हणजे शासन दरबारी आपले वजन खर्ची घालून आमदार नितेश राणे यांनी याबाबतचा शासन आदेश काढायला लावला आहे हा रस्ता केवळ विशेष बाब म्हणूनच दर्जोन्नती केल्याचे शासनादेशात म्हटले आहे