*कोकण Express*
*कवी संतोष जोईल यांच्या कवितासंग्रहाविषयी केलेलं थोडसं शब्दांकन…….*
दुष्काळग्रस्त होऊ पाहताना,
तू, घाय मोकलून रडलास |
आणि पाऊस कितीही पडू दे, म्हणताना…
तू अनाथही होऊन गेलास ||
संघर्षाचे जीवन जगताना,
तू गर्दीतही हरवून गेलास |
माझा मी राहिलोच नाही,
हे छाती ठोकपणे सांगून गेलास ||
तू शिरलास बिन नावाच्या गावात,
अवघ्या विश्वाचा तू होऊन गेलास |
माणुसकी शोधता शोधता….. तू पुनर्जन्म घेण्याचा प्रयत्नही केलास ||
सर्जनशीलतेचा अभाव व्यक्त करताना,
तू दुःखाच्या किनाऱ्यावर थांबलास,
आता काहीच सहन होत नाही म्हणताना….
तू मरणाच्या सरणावरही जाऊन पोहोचलास ||
अशा या आगळ्यावेगळ्या आशयाच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी मा. श्री. अजय कांडर, प्रसिद्ध उद्योजिका मा. सौ. मानसी माजगावकर. उद्योजक श्री. दीपक माजगावकर, ललित लेखक प्रा. श्री. वैभव साटम, तसेच समाज प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे अध्यक्ष मा. श्री. मधुकर मातोंडकर, निवेदक मा. श्री. रुपेश पाटील यांच्या उपस्थितीत कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट यांचे सभागृहात फोंडाघाट येथे दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक १०.०० वा. पार पडणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहून कवी प्रा. श्री. संतोष जोईल यांच्या लेखणीतून अजून काही काव्यसंग्रह प्रकाशित होण्यासाठी त्यांना प्रेरित करू.