*कोकण Express*
*ओसरगाव येथील शिवसेनेचे नाना परब यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ओसरगावचे बारा पाच मानकरी व शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाना परब यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
ओसरगाव मध्ये शिवसेनेला भगदाड पडले आहे.गेल्या पाच वर्षात सरपंच यांच्या कारभाराला व पाच वर्षात कुठलेही विकासाचे काम न झाल्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत ,गणेश राणे व स्थानिक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.