वैभववाडीत ग्राहक दिन संपन्न

*कोकण Express*

*वैभववाडीत ग्राहक दिन संपन्न*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय वैभववाडी आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार श्री.रामदास झळके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आणि संस्थेच्या माहिती व कार्यदिशा या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर निवासी नायब तहसीलदार श्री. अशोक नाईक, वैभववाडी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. सुरज कांबळे, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्री.कृष्णात सूर्यवंशी, राजापूर अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री.संतोष नारकर, जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, कोषाध्यक्ष श्री. संदेश तुळसणकर व तालुका संघटक श्री.शंकर स्वामी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!