*कोकण Express*
*शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण*
*खारेपाटण विभागामध्ये शिवसेनेची नवी रणनीती*
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे .प्रत्येक तालुक्यामध्ये शिवसनेने चांगली कंबर कसली आहे .आपल्या पक्षाच वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी केलीय. खारेपाटण विभागामध्ये शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना भेटण्याचा सपाटा जोरदार लावला आहे. संदेश पारकर यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय. कासार्डे विभागामध्ये कार्यकर्ते आणि उमेदवारांची भेटी घेतल्यानंतर आज पुन्हा खारेपाटण विभागांमधील वारगाव येथील उमेदवार व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात आलीय. त्याचप्रमाणें या परिसरात भेटी घेण्याचा कार्यक्रम जोरात सुरू झालाय. प्रत्येक उमेदवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर आणि कणकवली तालुका अध्यक्ष शैलेश भोगले यांनी उमेदवार व कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करून अभिनंदन केले आहे मधुकर वळंजू , महेंद्र केसकर,अरून पांचळ, अंजली पांचळ, दयानंद कुडतकर या भेटीदरम्यान अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते