चिंचवली येथे “आत्मा “अंतर्गत भुईमूग लागवड प्रशिक्षण संपन्न

चिंचवली येथे “आत्मा “अंतर्गत भुईमूग लागवड प्रशिक्षण संपन्न

*कोकण Express*

*चिंचवली येथे “आत्मा “अंतर्गत भुईमूग लागवड प्रशिक्षण संपन्न*

*खारेपाटण : प्रतिनिधी*

कृषि व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सन २०२२-२३ आंतर्गत सोमवार दि.२१/११/२०२२ रोजी चींचवली येथे सकाळी ११.३० वाजता भुईमूग लागवड शेती प्रशिक्षण शाळेचा १ला वर्ग संपन्न झाला असून, सदर शेतीशाळा साठी छत्रपती शिवाजी महाराज कृषि महाविद्यालय, ओरोस चे विषय विशेषज्ञ प्रसाद ओगले  यांनी भुईमूग लागवडी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व्हीं.एम.पाटील, कृ.प. डी.डी.कांबळे,  कृ.स. व्हीं.के.पाटील, सागर चव्हाण, यू.के.राणे,शे.स.समिती सदस्य अनिल पेडणेकर,सरपंच रुंजी भालेकर व शेतकरी उपस्थित होते. कृषि सहाय्यक सागर चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. व्ही.के.पाटील यांनी कृषि विभागाच्या अन्य योजना बाबत माहिती दिली तसेच ए. टी.एम.पाटील यांनी “आत्मा “व “पी.एम. एफ.एम. ई.”योजने बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!