सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा संपन्न

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा संपन्न*

*ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली सभा*

*सिंधुदुर्गनगरी*

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा काँग्रेस कार्यालय ओरोस जैतापकर काॅलनी येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. निवडणूक होत असलेल्या जिल्ह्यातील 325 ग्रामपंचायतींचा आढावा घेण्यात आला. निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष यांनी सांगीतले. प्रदेश प्रतिनिधी व माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत यांनी निवडणूकीच्या रणनिती संदर्भात मार्गदर्शन केले. जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राहूल गांधी हे आपल्या सारख्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी आणि देशातील द्वेषाचे वातावरण नष्ट करण्यासाठी आणि देशाला एकसंघ ठेवण्यासाठी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत पदयात्रा करत आहेत. गेल्या आठ वर्षात देशातील वातावरण गढूळ झाले आहे त्याला जनता कंटाळली आहे. महागाई बेजरोगारीने जनता त्रस्त आहे. पूर्वीचे काँग्रेस राजवटीचेच दिवस चांगले होते असे जनता म्हणू लागली आहे त्यामुळे देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता आगामी काळात येईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख प्रदेश प्रतिनिधी अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, अभय शिरसाट, महेश अंधारी, प्रविण वरुणकर, किरण टेंबुलकर, विद्याप्रसाद बांदेकर, चंद्रशेखर जोशी, विभावरी सुकी, अमिदी मेस्त्री, संदरवल्ली पडीयाची, महेंद्र सांगेलकर, विधाता सावंत, वासुदेव नाईक, उमेश कुलकर्णी, प्रदिप मांजरेकर, सुभाष दळवी, रवींद्र म्हापसेकर, चंद्रकांत राणे, महेश डिचोलकर, समाधान बांदवलकर, आनंद परूळेकर, उल्का खांदाडे,जस्मीन लक्शमेश्वर, स्मीता वागळे, पल्लवी खानोलकर, सरदार ताजर, पराग मांणगावकर, सुरेश देवगडकर, योगेश्वर कुर्ले,हेमंत माळकर, केतनकुमार गावडे, समीर वंजारी, सुरज घाडी, अनिकेत दहिबावकर, महादेव दहिबावकर, गोविंद कुंभार, मीनाताई बोडके, अंकुश पारकर जैनब बोबडे, अस्लम बोबडे, अहमद बोबडे, तौसीफ शेख, तबरेज शेख, वसंत नाटेकर, महंमद रमदूल, फैजान पाटणकर, वसीम उमर काजी, करीम बोबडे, जावेद रमदूल, दिपक मोपेरकर, रमाकांत परब इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!