*कोकण Express*
*कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपचा ट्रॅक्टर मोर्चा : आमदार नितेश राणे यांची माहीती*
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ कणकवली विधानसभेच्या वतीने कणकवली येथील प्रांत कार्यालयावर 7 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी देवगड येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या मोर्चासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले त्यांनी आहे.