*कोकण Express*
*भाजपा प्रवेशाचा सिलसिला सुरूच…*
*शिरवल येथील अनेक जण भाजपमध्ये*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिरवल चव्हाणवाडी येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे राजेंद्र शांताराम चव्हाण, चर्मकार समाज माजी तालुका अध्यक्ष व सल्लागार यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला. कालपासून जेवढ्या जोरात टीका सुरू आहे त्या पेक्षा जास्तपटीने भाजपामध्ये इनकमिंग देखील सुरू आहे असा टोला यावेळी लगावण्यात आला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला एक सारखे धक्के मिळत आहेत. आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले व विकास कामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील प्रवेश कर्त्यांना दिली.
यावेळी आम. नितेश राणे, महेश शिरवलकर सरपंच, पंढरी शिरवलकर, राजन सावंत, सूचित गुरव,विलास मेस्त्री, ज्ञानेश्वर शिरसाट, नामदेव जाधव (भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ) रुपेश चव्हाण उपस्थित होते.