*कोकण Express*
*मनसे प्रमुख राज ठाकरे ३० नोव्हेंबरपासून सिंधुदूर्ग दौऱ्यावर*
*कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन चर्चा करणार:परशुराम उपरकर*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सिंधुदूर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे मनसैनिकांत उत्साह आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते विधानसभा व तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन चर्चा करणार आहेत.
तरी सर्व मनसैनिकानी या दौऱ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.
कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर बोलत होते यावेळी त्यांच्यासमवेत
मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.
परशुराम उपरकर म्हणाले,यापुर्वीच्या प्रलंबीत असलेल्या दौऱ्याची सुरूवात राज ठाकरे हे सिंधुदुर्गमधून करत ते रायगडपर्यंत जाणार आहेत. तरी मुंबई, नवीमुंबई, ठाणे व इतर भागातील मनसैनिकांनी हा दौरा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तसेच ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने पुर्वतयारीसाठी दौऱ्याअगोदर जिल्ह्यात दाखल व्हावे, असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले आहे.
राज ठाकरे ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी जिल्ह्यात येणार असून १ व २ डिसेंबर रोजी जिल्हा दौरा असणार आहे. याबाबतच्या कार्यक्रमांची निश्चिती अद्याप व्हावयाची आहे. मात्र, हा दौरा व ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने स्थानिकांना मदत करण्याच्या अनुषंगाने मुंबई, नवीमुंबई, ठाणे व इतर भागातील सर्व मनसेचे पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी व मनसैनिकांनी आगावू दोन दिवस यावे. २८ नोव्हेंबर पासून ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे असून त्याची पुर्वतयारीही यावेळी करता येईल, असेही श्री. उपरकर म्हणाले.
तसेच पत्रकार, प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्याशीही राज ठाकरे चर्चा करणार आहेत, गाठीभेटी घेणार आहेत. तरी सर्व मनसैनिकानी सहभागी व्हावे, असे आवाहनही परशुराम उपरकर यांनी केले.