*कोकण Express*
*जागतिक वारसा सप्ताह 2022.निमित्त किल्ले खारेपाटण येथे स्वच्छता मोहीम*
*कासार्डे;संजय भोसले*
गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने खारेपाटण ता. कणकवली येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहीमे मध्ये किल्ले खारेपाटण येथील दिंडी दरवाजा,शिवकालीन भुयारी मार्ग, बुरूज,आणि तटबंदीवरील वाढलेली झाडे झुडपे,दुर्गा देवी मंदिरा बाहेरील परिसरातील गवत काढून स्वच्छ करण्यात आले. छत्रपतींचे गड किल्ले हे मनाला शक्ती उर्जा देणाऱ्या वास्तू आहे. याचे जतन, संवर्धन, संरक्षण झाले पाहिजे. ज्या मुळे पुढील येणाऱ्या पिढीला हा इतिहास समजू शकेल. व या इतिहासा मधून प्रेरणा भेटेल याच भावनेतून गड किल्ले संवर्धन संस्था.महाराष्ट्र राज्य महिन्यातून १ दिवस महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावर जाऊन अशा विविध स्वच्छता मोहीमा राबण्याचे काम गेली अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहे. या मोहीमेचे आयोजन कोकण विभाग अध्यक्ष- शुभम रानम ,सपंर्क प्रमुख- शुभम फाटक,अभिजीत तिर्लोटकर यांनी केले. या मोहिमेमध्ये सचिव-विक्रांत मोरये,राजेश काळे,गुरुनाथ काळे,पंकज गुरव,राकेश फाटक,प्रतिक गमरे ,सुरज रानम ,अक्षय येरम,स,अक्षय कोकरे, समीर गुरव, नितीन नारकर, विकास तोरसकर,प्रणय फाटक,आकाश रानम,वैभव गुरव,प्रथमेश मांजरेकर,सुरज मोरे,सुरज लाड, अनिकेत घाडी,सुशांत कामतेकर,राजू मोर्ये,ओंमकार गिरकर,सौरभ मणचेकर,अनिरुद्र तिर्लोटकर,शैलेश तिर्लोटकर,अभिषेक गुरव,प्रशांत गुरव,मनोज गुरव,सुरेद्र मोर्ये,चेतन गुरव,रामा तांबे,जयवंत तांबे,किशोर ठुकरूल,रोहित ठुकरूल असे 50 दुर्ग सेवक उपस्थितीत होते. या मोहीमेला किल्ले खारेपाटण संवर्धन समिती चे समन्वयक – ऋषिकेश जाधव,मंगेश गुरव हे सहभागी झाले होते.तसेच त्यांचे या मोहिमेला चांगले सहकार्य लाभले.