*कोकण Express*
*वैभववाडी तालुका भाजपा मागासवर्गीय सेल चे अध्यक्ष श्री सुनिल कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश*
*वैभववाडी ःःप्रतिनिधी*
काल झालेल्या सुषमा अंधारे यांच्या कणकवली येथील महाप्रबोधन यात्रेमध्ये कोळपे गावचे भाजपचे तालुका मागासवर्गीय सेल चे अध्यक्ष यांनी भाजप राणे समर्थक यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये आपल्या 50 सहकाऱ्यांसह जाहीर प्रवेश केला.
त्यांच्या या प्रवेशामुळे कोळपे गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चांगला फायदा होणार आहे, मागील पाच वर्षा पूर्वी त्यांच्या पत्नीने कोळपे मतदार संघातून जिल्हा परिषद निवणूक लढवली होती त्यात त्यांना अवघ्या थोड्या मताने पराभव पत्करावा लागला होता.या मतदार संघामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे,
त्यांच्या या प्रवेशा वेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेत्या संजना घाडी उपनेते व संपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवण चे आमदार वैभवजी नाईक.. जिल्हा प्रमुख संजय पडते, महीला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीशजी सावंत , शिवसेना नेते अतुलजी रावराणे, शिवसेना वैभववाडी