महिन्यातून एकदा जनता दरबार व्हावा

महिन्यातून एकदा जनता दरबार व्हावा

*कोकण Express*

*महिन्यातून एकदा जनता दरबार व्हावा*

*माजी सभापती मंगेश तळवणेकर यांची मागणी**सावंतवाडी ः प्रतिनिधी*

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यानी कार्यकर्ते नागरिक यांच्याशी संवाद साधण्यासाठी महिन्यातून एकदा जनता दरबार व्हावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश तळवणेकर यांनी केले आहे.

तळवणेकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत तालुकास्तरीय भाजपा व शिंदे गटाचे तालुकास्तरीय मोठे नेते निवडणुक लढवित असल्याने युती करण्यात आली .मंत्री महोदयांनी जाहीरही केले की यापुढे सर्व निवडणुका युतीनेच लढवणार. त्यामुळे सर्वच निवडणुका युतीनेच लढतील म्हणून शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही आनंद व उत्साह झाला. परंतु आता होणाऱ्या ग्रा.पं. निवडणुकीत युती झाली नाही, ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्यांनी आता आमनेसामने लढणे भाग आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ व प्रमाणिक कार्यकते.बाबल ठाकूर यांच्या सारखे कितीतरी कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे. यापुढे ग्रा.पं. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद वगैरे निवडणुकीत सुद्धा असेच होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील चांगल्या कार्यकर्त्यांनी याचा विचार करावा. अशी मागणी यावेळी तळवणेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!