*कोकणातील जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा…*

*कोकणातील जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा…*

*कोकण Express*

*कोकणातील जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा…*

*राजन साळवींकडून संकेत; लोकांनी पसंती दिल्यास नाणारही होईल…*

*मुंबई ता.२३:*

बहुचर्चित ठरलेल्या कोकणातील जैतापूर प्रकल्पाला अखेर यश मिळण्याची शक्यता आहे.त्याठिकाणी असलेल्या ९० टक्के स्थानिक शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला स्वीकारला आहे.त्यामुळे आता हा प्रकल्प होण्याची शक्यता आहे,असे संकेत आमदार राजन साळवी यांनी दिले.दरम्यान नाणार प्रकल्पाला तेथील लोकांनी सहमती दर्शविल्यास तो प्रकल्प सुद्धा मार्गी लावण्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली जाईल,असे त्यांनी सांगितले.एका खासगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.यावेळी त्यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले,कोकणातील जैतापूर प्रकल्पाचा आणि नाणार प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा होत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.जैतापूर येथील ९० टक्के स्थानिकांनी जमिनीचा मोबदला स्वीकारला असल्याने आता प्रकल्पाबाबत भूमिका केंद्र सरकार घेईल.कोकणात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असून या हाताना काम देण्यासाठी मोठ्या प्रकल्पाची गरज आहे.जर स्थानिकांनी मागणी केली, तर नाणार प्रकल्पाबाबत सुद्धा मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील,असे श्री.साळवी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!