*कोकण Express*
*कास ग्रामपंचायत निवडणुकीत संरपंच पदासाठी युवा चेहरा अमोल भाईप*
*बांदा ःःप्रतिनिधी*
ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागात मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत.काही प्रभागात उमेदवार निश्चित झाले असून काही प्रभागात चाचपणी प्रत्येक पक्षाची सुरू आहे.आता यामध्ये इच्छुक उमेदवारांत सर्वात तरुण चेहरा म्हणून अमोल भिवा भाईप इच्छुक
कास गावातून निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली आहे.त्यामुळे कास गावामध्ये आता उमेदवारीसाठी खरी चुरस पाहायला मिळणार आहे. कास पंचक्रोशीत शासकीय ठेकेदार म्हणून ओळख असलेल्या अमोल भाईप याला युवा पिढीचा पाठींबा मिळत असून त्याच्या मित्र परिवारानेही अमोल निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शासकीय ठेकेदार दादा भाईप यांचा चिरंजीव. त्यामुळे अमोल भाईप निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने कास गावात मध्ये आता उमेदवारीसाठी खरी चुरस निर्माण होणार आहे.