ऑनलाईन कार बुकींग करताना पर्यटकाच्या खात्यातुन गेलेल्या रक्कमेपैकी पावणेदोन लाख रुपये अवघ्या तासाभरात सायबर विभागाने आणले परत,सिंधुदुर्ग सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

ऑनलाईन कार बुकींग करताना पर्यटकाच्या खात्यातुन गेलेल्या रक्कमेपैकी पावणेदोन लाख रुपये अवघ्या तासाभरात सायबर विभागाने आणले परत,सिंधुदुर्ग सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

*कोकण Express*

*ऑनलाईन कार बुकींग करताना पर्यटकाच्या खात्यातुन गेलेल्या रक्कमेपैकी पावणेदोन लाख रुपये अवघ्या तासाभरात सायबर विभागाने आणले परत,सिंधुदुर्ग सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी*

*सिंधुदुर्गता.१९*

आरोंदा ते सावंतवाडी रेल्वे स्थानक प्रवासा करिता काल ता.१८ ऑनलाईन कार बुकींग करताना झाली होती 5 लाखांची फसवणूक.

सदर घटनेबाबत तक्रारदार सावंतवाडी पोलीस ठाणे येथे आले असता पोलीस निरिक्षक श्री .मेंगडे
यांनी तक्रारदार यांच्या फसवणूकीच्या व्यवहाराची सर्व माहिती घेवून ती माहिती सिंधुदुर्ग सायबर विभागाला फोनव्दारे तात्काळ पुरविली असता सायबर पोलिसांनी झालेल्या सर्व फ्रॉड व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा भिलाई छत्तीसगड येथील ठावठिकाणा काढत आरोपीने क्रेड ॲप व्दारे केलेले सर्व फ्रॉड व्यवहार तात्काळ ब्लॉक केले व तक्रारदाराला एकूण रक्कमेपैकी 1 लाख 71 रुपये 01 तासांचे आत परत मिळवून दिले, तसेच उर्वरित 3 लाख रुपये संबंधित बँकेमध्ये होल्ड करण्याची कार्यवाही सायबर विभागाकडून करण्यात आलेली आहे.
या गुन्ह्याचा तांत्रिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे अधिकारी सपोनि/ बळीराम सुतार, सपोनि/महेंद्र घाग ,पोकॉ/ स्वप्निल तोरस्कर , मपोकॉ/धनश्री परब, मपोकॉ/स्नेहा चरापले तसेच सावंतवाडी पोलीस ठाणे निरिक्षक फुलचंद मेंगडे व पोउनि/सुरज पाटील यांनी केला.

आपला ओटीपी,एटीएम कार्ड/पीन, सीव्हीव्ही कोणासही शेअर करू नये, तसेच सायबर फ्रॉडला बळी पडल्यास https://cybercrime.gov.in/ किंवा 1930 वर तात्काळ तक्रार करावी असे आवाहन सिंधुदुर्ग पोलीसांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!